‘५.३ षटकांतच आमचा जलवा राहिला’ पृथ्वी शॉ बाबतच्या वीरेंद्र सेहवागच्या ‘त्या’ ट्विटची होतेय जोरदार चर्चा

पृथ्वी शॉने अशी काही बॅटिंग केली की, त्याच्यामुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या ५ षटकांत पूर्णपणे सामन्यातून बाहेर पडला. पृथ्वी शॉच्या बॅटिंगमध्ये तेंडुलकर, सेहवाग आणि लाराची झलक दिसून येते, असं म्हणतात .

  सोशल मीडियावर कायम सक्रिय राहत चर्चेचा विषय बनणाऱ्या वीरेंद्र सेहवागने भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयाबाबत कौतुक करणारे सेहवागचे ‘ते’ ट्विट व्हायरल झाले आहे.

  वीरेंद्र सेहवागने स्वत: चा, ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, ‘पहिल्या ५.३ षटकांतच आमचा जलवा राहिला.’ सेहवाग, सचिन आणि लारा यांची झलक पृथ्वी शॉमध्ये (Prithvi Shaw)दिसते आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं. या ट्विटमधून सेहवागने पृथ्वीचं कौतुकही केलं आणि शास्त्रींची फिरकीही घेतली.

  पृथ्वी शॉच्या बॅटिंगमध्ये या खेळाडूंची झलक

  पृथ्वी शॉने अशी काही बॅटिंग केली की, त्याच्यामुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या ५ षटकांत पूर्णपणे सामन्यातून बाहेर पडला. पृथ्वी शॉच्या बॅटिंगवर वीरेंद्र सेहवागने एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वी शॉच्या बॅटिंगमध्ये तेंडुलकर, सेहवाग आणि लाराची झलक दिसून येते, असं म्हणतात .

  या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २६२ घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य ७ गडी आणि ८०चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (८६) आणि इशान किशनच्या (५९) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने २४ चेंडूत ४३धावांची खेळी करताना ९ चौकार लगावले. भारताच्या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३१ धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिले.