टी-२० वर्ल्डकपमध्ये कुणाला लागणार लॉटरी, विराट सेनेत होणार मोठे बदल

आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याला पुढील सूचना मिळेपर्यंत दुबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सॅमसनच्या टीमला प्ले ऑफमध्ये जागा मिळाली नसली तरी त्याच्या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा १५ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संजूची नव्या टीममध्ये निवड़ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या असलेल्या टीममध्ये अनेकजण दुखापतीने तर काही जण खराब फॉर्मंमुळे चिंतेत आहेत, त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

  नवी दिल्ली – टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा अवधी राहिला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची पहिलीच मॅच पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, वर्ल्डकप पूर्वी निवड समिती सध्याच्या टीममध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या एका क्रिकेटरला, आयपीएल संपल्यावर दुबईतच थांबण्यास बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या क्रिकेटरचा समावेश टीम इंडियाच्या वर्ल्डकप टीममध्ये होण्याची शक्यता आहे.

  आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याला पुढील सूचना मिळेपर्यंत दुबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सॅमसनच्या टीमला प्ले ऑफमध्ये जागा मिळाली नसली तरी त्याच्या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा १५ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संजूची नव्या टीममध्ये निवड़ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या असलेल्या टीममध्ये अनेकजण दुखापतीने तर काही जण खराब फॉर्मंमुळे चिंतेत आहेत, त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

  सॅमसनने दुबईत चांगली कामगिरी केली आहे. सात मॅचमध्ये त्याने २०७ रन्स केल्या असून, ८२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे, तर विकेटकिपर असल्याचाही त्याला फायदा होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या आणि राहुल चहर यांसारख्या खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी संजूचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

  टी-२० वर्ल्डकपची सुरुवात १७ ऑक्टोबरला दुबईत होणार असून, यात १६ टीम सहभागी होणार आहेत. या टुर्नामेंटची फायनल १४ नोव्हेंबरला दुबईत होणार आहे.

  टी-२० साठीची सध्याची टीम

  विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकूमार यादव, रुषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश आहे.