वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जिंकणारा होणार मालामाल, विजेत्या संघाला किती कोटींच बक्षीस आहे माहिती आहे का ?

आयसीसीने(ICC) पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या(WTC Final) बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला १६ लाख डॉलर्स म्हणजेच ११.७२ कोटी(prize money of USD 1.6 million To Winning Team in WTC Final) रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.

    आयसीसीने(ICC) पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या(WTC Final) बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला १६ लाख डॉलर्स म्हणजेच ११.७२ कोटी(prize money of USD 1.6 million To Winning Team in WTC Final) रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच ५.८५ कोटी मिळतील.


    भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli)आयपीएलमधील मानधन या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे. आयपीएलमध्ये विराटला प्रत्येक हंगामात १७ कोटी रुपये मिळतात.

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे हा अंतिम सामना होणार आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या कर्णधारपदांमध्ये आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे दोघेही विजेतेपद मिळवून इतिहासात नाव नोंदवण्यासाठी आतूर असतील.

    हा सामना ड्रॉ झाला, तर दोन्ही संघ संयुक्त विजेते असतील. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विजेत्या आणि उपविजेत्यासाठी बक्षीस रकमेची अर्धी-अर्धी रक्कम मिळेल. इतकेच नाही तर विजेत्या संघाला आयसीसीकडून गदाही मिळेल. आयसीसीनेही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. पाच दिवसांत सामना झाल्यास या दिवसाचा उपयोग केला जाईल. यावर मॅच रेफरी निर्णय घेतील.