अलिबागमधील महिलेला १ कोटी १२ लाखांचा गंडा; फेसबुक फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पडली महागात

अलिबाग येथील बँकांमधील पेन्‍शन खाते, बचत खात्‍यातील रक्‍कम आणि सोने तारण ठेवून कर्ज काढून तब्बल १ कोटी १२ लाख ९२ हजार ८०० इतकी रक्कम त्या इसमाच्या खात्यांमध्ये जमा केली. हा व्‍यवहारच बोगस होता. परंतु ही महिला जाळ्यात पूर्णपणे फसली. मात्र, तिला कुठले गिफ्ट मिळाले नाही.

    अलिबाग – सोशल मीडियाच्‍या (Social Media) माध्‍यमातून सेवानिवृत्‍त महिलेला (Retired Woman) तब्‍बल एक कोटी १२ लाख रूपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. अलिबाग (Alibaug) येथे राहणाऱ्या एक महिला मागील वर्षी कोर्ट सुपरिटेडेंट (Court Superintendent) म्हणून निवृत्त झाल्या. एक दिवस त्यांनी इंग्लंडमधून आलेली एका इसमाची फेसबुकवर (Facebook) फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. आधी त्या इसमाने या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने फसवणूक केली आहे.

    इंग्लंडमधून तुला सरप्राईज म्हणून गिफ्ट पाठविले असल्याचे तिला सांगितले. कस्टम ऑफीस-दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता गिफ्ट टॅक्स, गिफ्टमध्ये असलेली करन्सी एक्सचेंज टॅक्स, त्याचप्रमाणे गिफ्ट पार्सलमध्ये सोने आणि करन्सी असून इंडियन रुपयामध्ये त्याची किंमत ९९ लाख रुपये असल्याचे त्यांना सांगितले. या कटात आरोपीसोबत आणखी सहाजण जोडले होते. गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादी याचे खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकूण किती पैसे भरायचे, याबाबत सांगितले.

    इतकी मोठी रक्कम अनोळखी माणून मागत असतानाही या महिलेला संशय आला नाही. अलिबाग येथील बँकांमधील पेन्‍शन खाते, बचत खात्‍यातील रक्‍कम आणि सोने तारण ठेवून कर्ज काढून तब्बल १ कोटी १२ लाख ९२ हजार ८०० इतकी रक्कम त्या इसमाच्या खात्यांमध्ये जमा केली. हा व्‍यवहारच बोगस होता. परंतु ही महिला जाळ्यात पूर्णपणे फसली. मात्र, तिला कुठले गिफ्ट मिळाले नाही. यानंतर समोरच्या व्‍यक्‍तीने फेसबुकवरून अकाउंट बंद केले. अखेर या महिलेले अलिबाग पोलीसात धाव घेतली आहे.