In front of the police station, the young man set it on fire; Shocking scene in front of Wagholi police station; The condition of the youth is alarming

उल्हासनगरमध्ये सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

    ठाणे: उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या (Brother Killed His Sister) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येमागचं कारण पोलीसही चक्रावुन गेले आहेत.  या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

    नेमकं प्रकरण काय?

    उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात १२ वर्षीय मृत मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनी सोबत राहत होती. तर तिचे आईवडील गावी राहतात. काही दिवसापुर्वी तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली. मात्र, ही बाब माहीत होताच तिची काळजी घ्यायचं सोडून भावाने तिचा छळ केला. तब्बल तीन दिवस त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा छळ सहन न झाल्यानं या १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    वहिनीने दिली चुकीची माहिती

    या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती दिली. तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं तिने मृत मुलीच्या भावाला  सांगितलं. त्यामुळं भावाने संतापाच्या भरात तिला मारहाण केली. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.