
2006 मध्ये, नोएडातील निठारी गावात मोनिंदर सिंग पंढेर यांच्या घराच्या मागील अंगणात अनेक पीडितांचे मृतदेह सापडले होते. यानंतरही पोलिसांना आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आला नाही.
नोएडाच्या प्रसिद्ध निठारी प्रकरणातील (Nithari Case) आरोपी सुरेंद्र कोळीची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय जाहीर केला. न्यायालयाने सुरेंद्र कोळीची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोठी डी 5 चे मालक मोनिंदर सिंग पंधेर यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
नोएडाच्या प्रसिद्ध निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोळी आणि मनिंदर सिंह पंधेर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिलाह. अलाहाबाद हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून कोल यांना १२ खटल्यांत तर मनिंदरसिंग पंढेरची दोन प्रकरणांत निर्दोष मुक्तता केली आहे. मनिंदर सिंग पंढेर यांच्या वकिलाने याबाबत माहिती दिली आहे.
काय निठारी हत्याकांड?
1 7 मे 2006 रोजी पंढेर याने निठारी येथे राहणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने बोलावले होते. यानंतर मुलगी घरी परतली नाही. मुलीच्या वडिलांनी नोएडातील सेक्टर-20 पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांना निठारी येथील मोनिंदर सिंग पंढेर यांच्या घरामागील नाल्यात 19 मुले आणि महिलांचे सांगाडे सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना अटक केली. नंतर निठारी प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली. सीबीआयने मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर सिंग पंढेर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
घरात लहान मुलांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले, तरीही आरोप सिद्ध झाले नाही
2006 मध्ये, नोएडातील निठारी गावात मोनिंदर सिंग पंढेर यांच्या घराच्या मागील अंगणात अनेक पीडितांचे मृतदेह सापडले होते. यानंतरही पोलिसांना आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आला नाही. मृतदेह सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यावेळी बेपत्ता महिला प्रकरणाच्या तपासादरम्यान पंढेर यांच्या घरामागील परिसराची झडती घेण्यात आली. यावेळी नोएडा पोलिसांना मानवी सांगाडे सापडले होते.