19 लाखाचे मोबाईल चोरल्यानंतर दमलेला चोरटा बॅग घेऊन रेल्वे स्टेशनवरच झोपला आणि मग…

उल्हासनगरमध्ये साऊंड ऑफ म्युझिक हे मोबाईलचं दुकान फोडून एका चोरट्याने तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे मोबाईल चोरी केले होते. या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या २ तासात अटक करत त्याच्याकडून सर्व मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान हा सराईत आरोपी असून त्याची पोलिसांनी धिंड काढली होती(19 lakh mobile lamps smashed in Ulhasnagar).

    उल्हासनगरमध्ये साऊंड ऑफ म्युझिक हे मोबाईलचं दुकान फोडून एका चोरट्याने तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे मोबाईल चोरी केले होते. या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या २ तासात अटक करत त्याच्याकडून सर्व मोबाईल जप्त केले आहेत.
    दरम्यान हा सराईत आरोपी असून त्याची पोलिसांनी धिंड काढली होती(19 lakh mobile lamps smashed in Ulhasnagar).

    अहमद फिरोज नईम अहमद उर्फ मोनू असं अटक सराईत चोरट्याचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात साउंड ऑफिस म्युझिक या मोबाईल दुकानात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छत तोडून अहमदने आत प्रवेश केला. दुकानातील तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे सॅमसंग आणि अॅप्पल कंपनी मोबाईल चोरून पोबारा केला.

    चोरी केलेली मोबाईलची बॅग चोरट्याने रेल्वे स्टेशनवर लपवली आणि त्याच ठिकाणी झोपला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना अहमद हा संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आला. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये हे सगळे मोबाईल सापडले.त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.