मालकाच्या जेवणात गुुंगीचं औषध टाकलं, 2.50 कोटींचे हिरे चोरून नौकरांनी बिहार गाठलं; मात्र आधार क्रमांकनं केला भांडाफोड!

दोन्ही नोकरांनी 10 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मालाक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात काही गुंगीचं औषध मिसळलं आणि ते झोपल्यांनतंर घरातील कपाटातून मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.

  मुंबई : मुंबईतील मालाड येथील उच्चभ्रू वस्तीत एक धाडसी चोरी झाल्याची घटना (Mumbai Crime News) उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्याच्या घरी काही दिवसापुर्वी चोरी झाली होती. या प्रकरणी तपास सुरू होता. तपासादरम्यान, ही चोरी करणारं दुसरं तिसरं कुणी नसून त्यांच्या घरातील नोकरचं असल्याची बाब समोर आली आहे. या चोरांनी मोठ्या शिताफीने मालकाच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून तो झोपल्यानंतर घरात चोरी करुन बिहारला पोबार केला होता. व्यापाऱ्याच्या घरातून अडीच कोटी रुपयांचे दागिने चोरून बिहारला पळून गेलेल्या दोन नोकरांना पोलिसांनी आता पकडले आहे. आधार कार्ड क्रमांकावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत मिळाली.

  चोरांना अटक

  पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नीरज उर्फ ​​राजा यादव (19) आणि राजू उर्फ ​​शत्रुघ्न कुमार (19) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी 10 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मालाक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात काही गुंगीचं औषध मिसळलं आणि ते झोपल्यांनतंर घरातील कपाटातून मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.

  नेमकं काय घडलं

  पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना ११ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली जेव्हा ५५ वर्षीय तक्रारदार मालकाला त्याच्या फ्लॅटमधून हिऱ्याचे दागिने गायब झाल्याचे समजले. माझ्या कुटुंबातील सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले कारण झोपेतून उठल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी घरातील नोकर गायब होते त्यामुळे त्यांच्यावरील संयशावरुन नोकरावर चोरीसह इतर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला.

  उल्लेखनीय आहे की, अटक करण्यात आलेल्या शत्रुघ्न कुमारला 50 लाखांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. सध्या राजा यादव यांचा अधिक तपास करणं सुरू आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.