गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात 2 शार्प शूटरला अटक; आरोपीमध्ये हरयाणाच्या फौजीचा समावेश

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुजरातमधील मुंद्रा विमानतळावरून दोन शार्प शूटरला अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी मुसेवाला यांच्यावर गोळी झाडली होती. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नव्हती. शूटरपैकी एक हरयाणातील सोनीपतचा प्रियवर्त फौजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरा येथीलच अंकित सेरसा असू शकतो. या दोघांनाही पंजाब पोलिसांनी मूसेवाला यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या यादीत ठेवले होते. याबाबत दिल्ली पोलिस लवकरच खुलासा करणार आहेत(2 sharp shooters arrested in Sidhu Musewala murder case).

    चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुजरातमधील मुंद्रा विमानतळावरून दोन शार्प शूटरला अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी मुसेवाला यांच्यावर गोळी झाडली होती. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नव्हती. शूटरपैकी एक हरयाणातील सोनीपतचा प्रियवर्त फौजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरा येथीलच अंकित सेरसा असू शकतो. या दोघांनाही पंजाब पोलिसांनी मूसेवाला यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या यादीत ठेवले होते. याबाबत दिल्ली पोलिस लवकरच खुलासा करणार आहेत(2 sharp shooters arrested in Sidhu Musewala murder case).

    प्रियवर्त फौजी व अंकित 25 मे रोजी हरयाणातील बिस्ला पेट्रोल पंपावर दिसले होते. घटनेनंतर त्यांच्या बोलेरोमधून जप्त करण्यात आलेल्या या पेट्रोल पंपाच्या स्लिपवरून या शार्प शूटर्सची ओळख पटली.

    प्रियवर्त हा हरयाणातील सोनीपतमधील गढी सिसाना येथील रहिवासी आहे. कुख्यात प्रियव्रतवर 2 खुनासह एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सोनीपतच्या खरखोडा आणि बडोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला 10 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. दीड वर्षांपूर्वी कृष्णा हत्याकांडात त्याचे नाव समोर आले होते. यानंतर हरयाणा पोलिसांनी त्याच्यावर 25 हजारांचे बक्षीस ठेवले आहे.

    पंजाब पोलिसांनी या प्रकरणी आणखी 4 शार्प शूटरची ओळख पटवली आहे. हरयाणातील सोनीपत येथील प्रियवर्त आणि अंकित यांच्याशिवाय पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी जगरूप रूपा आणि मोगाचा मनू कुस्सा यांचा यात समावेश आहे. पंजाब पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.