धक्कादायक! 12 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, कौटुंबिक वादामुळे होती डिप्रेशनमध्ये

घरातील वातावरण चांगलं नसल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती समोर आली आहे. यामधून तीने गळफास घेतल्याच म्हण्टलं जाता आहे.

  आजकाल क्षुल्लक कारणावरुन लोकं आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे. मात्र यामध्ये सातत्याने लहान मुलंमुलीचं नाव समोर येऊ लागलं आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानातील लाहोरमध्ये आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या (12 year Boy Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता अशीच एक घटना भारतात घडली आहे. क्षुल्लक गोष्टीसाठी मुलीनं आत्महत्येचं पाऊल (12 year Girl Suicide) उचलल्याने आई-वडीलांना धक्का बसला आहे. दिल्लीतील बवना येथील पूत खुर्द परिसरात एका 12 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादामुळे मुलगी डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती समोर आली आह. पोलीस मृतदेहाचे शवविच्छेदन करत असून कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

  नेमका प्रकार काय

  अंजली उर्फ ​​सोना असे मृत मुलीचं नाव आहे. बवाना येथील राज वाटिका येथील छोटा पूथ परिसरात ती राहत होती. शनिवारी सकाळी अंजलीने गळफास घेतल्याची माहिती बवाना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता खोलीच्या बेडवर मृतदेह पडलेला दिसला.

  मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांमध्ये तीन वर्षांपासून वाद सुरू होता आणि आईने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घरातील वातावरण चांगलं नसल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र तीच्या अशा अचानक जाण्याने तीच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.

  शाळेतून घरी आल्यावर घेतला गळफास

  याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत मुलगी, तिचे वडील, भाऊ आणि आजी यांच्यासोबत राहत होती  तर आई पूनम या तीन वर्षांपासून शहााबाद डेअरी परिसरात तिच्या माहेरी राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  तिच्या आईने पतीविरोधात कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. तेव्हापासून ती डिप्रेशन मध्ये होती. कुटुंबीयांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 7.15 वाजता अंजली शाळेत गेली होती. शाळा बंद असल्याने  ती घरी परतली. साडेनऊच्या सुमारास आजी बिमलाने तिला शाळेच्या ड्रेसमध्ये पंख्याला लटकलेले पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला तसेच गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून पुरावे गोळा केले.