मुंबईत तलवारीने कापले २१ केक; तरुणावर गुन्हा दाखल

वाढदिवसानिमित्त २१ केक तलवारीने कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील एका तरूणाने तलवारीने केक कापल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. त्यानंतर १७ वर्षीय युवकाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

    मुंबई : लहान मुलांप्रमाणेच आता तरूणांमध्येही जल्लोषात वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करण्याची क्रेझ आहे. त्यासाठी वेगवेगळे फंडे (New Style) वापर असल्याचे दिसून येते. यामुळे अनेकदा आपण काय करत आहोत याचे भान देखील राहत नसल्याचे समोर येते. या कारणाने तरुणांना टिकेचा सामना करावा लागतो. मुंबईत (Mumbai) एका तरुणाने तलवार घेउन चक्क २१ केक कापल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वाढदिवसानिमित्त २१ केक तलवारीने कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील एका तरूणाने तलवारीने (Sword) केक कापल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल (Crime File) करण्यात केला आहे. त्यानंतर १७ वर्षीय युवकाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

    तलवारीने केक कापल्यामुळे याआधी अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील बोरिवली येथील एमएचबी कॉलनीत ही घटना घडली आहे. एका तरूणानेही तब्बल २१ केक तलवारीने कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे.