जालन्यात ३९० कोटी जप्त; इन्कम टॅक्सचे ‘दुल्हन हम ले जायेंगे’

आयकर विभागाने केलेल्या जालन्यातील कारवाईत अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछाने आणि अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. शहराबाहेरील आठ फार्महाऊसमध्ये ही रोकड सापडली. जालन्यातील या कारवाईमध्ये स्टील तीन व्यवसायिकांकडे रोख रकमेसह दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे आढळून आले असून, सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे.

    जालना : आयकर विभागाने (Income Tax Department) जालन्यामध्ये (Jalna) एक स्टील कारखान्यासह (Steel Plant) त्याच्या मालकाच्या घरावर छापा (Raid) मारून मोठी रक्कम जप्त (Amount Seized) केली. या कारवाईत सुमारे ३९० कोटींची सापजले असून यामध्ये ५८ कोटींची रोकड, ३२ किलो दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज आणि सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या (Unaccounted Assets) कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टीकर लावण्यात आले होते.

    आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधारण १ ते ८ ऑगस्टदरम्यान चौकशी केली होती. त्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईसाठी नाशिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आणि राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात दाखल झाले होते.

    आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछाने आणि अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. अधिकाऱ्यांना शहराबाहेरील आठ फार्महाऊसमध्ये ही रोकड सापडली. जालन्यातील या कारवाईमध्ये स्टील तीन व्यवसायिकांकडे रोख रकमेसह दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे आढळून आले असून, सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे.