धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात घुसले होते आरोपी

कर्नाटकातील गदग शहरात एकाच कुटुंबातील चार जणांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. चोरीच्या उद्दशाने घरात घुसलेल्या आरोंपीनी घरातील सदस्यांची हत्या केली.

  कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी (Karnataka Crime News) समोर आली आहे. गदग शहरात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरांंनी कुटुंबातील चार जण झोपेत असताना त्यांची हत्या करून तेथून पळ काढला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहे. हत्येमागील कारणाचाही शोध घेतला जात आहे.

  झोपेत चिरला गळा

  गदग शहरातील दसरा रस्त्यावर चाकूने गळा चिरून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये कार्तिक बकाले (27), परशुराम हादिमानी (55), त्यांची पत्नी लक्ष्मी हादिमानी (45) आणि मुलगी आकांक्षा हादिमानी (16) यांचा समावेश आहे. पीडित महिला झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री झालेल्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे आणि आसपासच्या लोकांचीही चौकशी करत आहेत.

  कुटुंबीय घराच्या पहिल्या मजल्यावर झोपले होते

  कुटुंबीय घराच्या पहिल्या मजल्यावर झोपले होते. तळमजल्यावर झोपलेले हदिमानी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक कार्तिक बकाले यांनाची हल्लेखोरांनी हत्या केली. कार्तिक हादिमानीच्या घरी एका एंगेजमेंट इव्हेंटसाठी जमला होता. घटनास्थळावरून तीन चाकू घराच्या मागे फेकलेले आढळून आले. नाल्यात सोन्याच्या बांगड्यांसह चाकू आणि दोन जोडे सापडले. यावरून असे दिसून येते की, खुनाच्या वेळी कदाचित संघर्षही झाला होता.

  गुन्हेगारांचा कुटुंबाशी कोणताही संबंध नव्हता किंवा ते त्यांच्या आधीपासून ओळखीचे होते. या कोनातूनही तपास सुरू आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे.