पाच  जणांना दरोडा घातल्याप्रकरणी पोलिसांकडून  अटक 

पोलिसांनी 5 जणांना दरोडा घातल्याबद्दल 18 जून रोजी अटक केली आहे. नवनाथ राऊत (वय 50 वर्षे, रा. दत्तवाडी जवळ शेळगाव, तालुका खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पिंपरी: पोलिसांनी 5 जणांना दरोडा घातल्याबद्दल 18 जून रोजी अटक केली आहे. नवनाथ राऊत (वय 50 वर्षे, रा. दत्तवाडी जवळ शेळगाव, तालुका खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    याप्रकरणी आकाश जाधव (वय 32 वर्षे व ज्ञानेश्वर पवार रा. शिक्रापूर, तालुका शिरूर), हसूरज चौगुले (वय 18 वर्षे) व महेश मंगळवेढाकर (वय 18 वर्षे, रा. मंचर, तालुका आंबेगाव) व मंचरमधील राहणारा एक विधिसंघर्षित बालक यांना अटक करण्यात आले आहे.
    आरोपींनी 18 जून रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरावर दरोडा टाकला. ओळख पटू नये म्हणून त्यांनी चेहरा लपविण्यासाठी मास्क घातला होता. तसेच, लोखंडी कोयता, एक्सा पान, कटावणी व मिरची पावडर, कटर स्क्रू ड्राइवर, चिकट टेप अशी हत्यारे जवळ बाळगून आकाश जाधव याने फिर्यादी नवनाथ राऊत यांचा कामगार बिसवास याला कोयत्याचा धाक दाखवून कॉलर पकडली, तर हसूरज चौगुले याने जबरदस्तीने रणजीतच्या खिशातील 2,000 रुपये काढून घेतले. याबाबत पाचही आरोपींविरोधात भा. द. वि. कलम 395, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.