५८१ किलोंचा ड्रग्जचा साठा उंदरांकडून फस्त; पोलिसांचा न्यायालयात दावा

उंदरांच्या धोक्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. पोलिसांच्या गोदामांमध्ये साठवण्यात आलेल्या ड्रग्जचा लिलाव अथवा विल्हेवाटीसंदर्भात न्यायालयाने पाच कलमी निर्देशही जारी केले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे कालबद्ध पद्धतीने पालन केले जाईल, असे अभिषेक यादव यांनी सांगितले.

    लखनौ – शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा (Marijuana Drug) साठा उंदरांनी (Rats) फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी (Mathura Police) विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात (Special Narcotis Drugs Court) केला आहे. एनडीपीसी कायद्याअंतर्गत यावर्षी जप्त केलेल्या मारिजुआना या ड्रग्जबाबत माहिती देण्यास न्यायालयाने सांगितल्यानंतर पोलिसांनी हा अहवाल सुपुर्द केला आहे. या ड्रग्जची किंमत तब्बल ६० लाख रुपये होती. पोलिसांच्या या दाव्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी (Additional District Judge) मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

    उंदरांच्या धोक्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. पोलिसांच्या गोदामांमध्ये साठवण्यात आलेल्या ड्रग्जचा लिलाव अथवा विल्हेवाटीसंदर्भात न्यायालयाने पाच कलमी निर्देशही जारी केले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे कालबद्ध पद्धतीने पालन केले जाईल, असे अभिषेक यादव यांनी सांगितले.

    सुनावणीदरम्यान न्यायालयाने हायवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणाचा उल्लेख केला. १९५ किलो ड्रग्ज उंदराने खाल्ल्याची माहिती सरकारी वकिलाने न्यायालयात दिली होती, असे न्यायाधीशांनी या सुनावणीदरम्यान सांगितले. या प्रकरणात सीओ रिफायनरीने केलेल्या तपासादरम्यान ड्रग्ज आढळून आले नाही, अशी माहिती एसएसपींनी न्यायालयात दिली आहे. आकाराने लहान असल्याने उंदरांना पोलिसांची भीती नसते. एसएचओ सर्व समस्यांचे निराकरण करण्यात तज्ज्ञ असू शकत नाही, असे स्पष्टीकरणही मथुरा पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आले आहे.