आठ वर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक

आठ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले असून यामध्ये 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सर्जेराव बनसोडे (वय 62 वर्षे, रा. मु. पो. ढवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    पिंपरी :  आठ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले असून यामध्ये 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सर्जेराव बनसोडे (वय 62 वर्षे, रा. मु. पो. ढवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.
    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे यांनी आठ वर्षांच्या मुलीला पत्राशेड, चिंचवड येथून आमिष दाखवून पळवून नेले. सदर घटना 19 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.