kolkata protest

कोलकात्यामधील तिलजला परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात रोष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून स्थानिकांनी तिलजला आणि बालीगंज परिसरात जोरदार आंदोलन केलं. दरम्यान, या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे नरबळी प्रकरण असू शकतं.

कोलकात्यामधील (Kolkata) तिलजला परिसरात एका 7 वर्षीय मुलीचा मृतदेह (7 Year Old Girl Murder) सापडल्यानंतर शहरात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी (Protest) काल (27 मार्च) बुंदेल गेट येथे जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. पार्क सर्कस आणि बालीगंज येथे रास्ता रोको करून वाहतूक थांबवून ठेवली होती. तसेच संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, हे नरबळी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरू केला आहे.


तांत्रिकाने द्यायला सांगितला नरबळी
कोलकात्यामधील तिलजला परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात रोष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून स्थानिकांनी तिलजला आणि बालीगंज परिसरात जोरदार आंदोलन केलं. दरम्यान, या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे नरबळी प्रकरण असू शकतं. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपी आलोक कुमार याला मूलबाळ नव्हतं. त्याच्या पत्नीचा तीनवेळा गर्भपात झाला आहे. त्यामुळे तो आणि त्याची पत्नी एका तांत्रिकाकडे गेले. त्यानंतर तांत्रिकाने त्यांना नरबळी देण्यास सांगितलं होतं.

संतप्त नागरिकांकडून पोलीस ठाण्याची तोडफोड
तक्रारीनंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली, शोध मोहीम सुरू असताना रविवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घातला. जमावाने पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. जमावाने तिलजला पोलीस ठाण्याची तोडफोड केली. अनेक ठिकाणी जमावाने टायर्स जाळले. तिलजला, बालीगंज परिसरात मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.