चेंडू समजून बॉम्बशी खेळणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन गायेन यांच्या घरी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांमध्ये त्यांच्या आठ वर्षांच्या भाचीचाही समावेश होता. झूमा खातून असे या भाचीचे नाव असून ती दुसऱ्या इयत्तेतमध्ये शिकत होती. ही मुलगी गायेन यांचे पाळीव गाढव बांधून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याजवळ बांधलेल्या बॉम्बशी चेंडू समजून खेळत होती. त्याचवेळी या बॉम्बचा स्फोट झाला आणि झूमाचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

    कोलकाता – पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर २४ परगना जिल्ह्यामधील मिनाख येथील तृणमूल काँग्रेसचे (Trinmul Congress) नेता अबू हुसैन गायेन (Abu Hussain Gayen) यांच्या घरात अपघात घडला आहे. गायेन यांच्या घरातील बॉम्बला (Bomb Blast) चेंडू समजून त्याबरोबर खेळणाऱ्या एका चिमुकलीचा बॉम्बचा स्फोट झाल्याने मृत्यू (Child Death) झाला. तसेच, या अपघातामध्ये काही मुले जखमी झाली आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अबु हुसैन यांना अटक केली असून ही घटना चपाली गावामध्ये घडली.

    बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन गायेन यांच्या घरी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांमध्ये त्यांच्या आठ वर्षांच्या भाचीचाही समावेश होता. झूमा खातून असे या भाचीचे नाव असून ती दुसऱ्या इयत्तेतमध्ये शिकत होती. ही मुलगी गायेन यांचे पाळीव गाढव बांधून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याजवळ बांधलेल्या बॉम्बशी चेंडू समजून खेळत होती. त्याचवेळी या बॉम्बचा स्फोट झाला आणि झूमाचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

    बशीरहाटचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौथम बॅनर्जी आणि एसडीपी अमीन इस्लाम यांच्या नेतृत्वामध्ये मिनाखाचे पोलीस ठाणे प्रमुख सिद्धार्थ मंडल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नेते असलेल्या गायेन यांच्या घरी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन झूमाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. गायेन यांनी गाढवाच्या कपाळावर बॉम्ब का बांधला होता? हे राजकीय षडयंत्र आहे का? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध पोलीस घेत आहेत.