
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी सारनाथ पोलीस ठाण्यात भोजपुरी गायक समर सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी (Akanksha Dubey Suicide) सारनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग (Samar Singh)आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंबईहून वाराणसीला पोहोचलेल्या आकांक्षाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
समर सिंहवर गुन्हा दाखल
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी सारनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आकांक्षाच्या आईने लावलेत गंभीर आरोप
पहिले वक्तव्य समोर आले आहे मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आईचे वक्तव्य पहिल्यांदाच समोर आले आहे. आता गायक समर सिंग आणि त्याच्या भावावर गंभीर आरोप आहेत. आकांक्षा दुबेच्या आईने भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. आकांक्षावर अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 21 मार्च रोजी आकांक्षा दुबे आणि गायक समर सिंहच्या भावामध्ये वाद झाला होता.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आकांक्षा
आकांक्षा ही मूळची भदोही येथील चौरी बाजार परिसरातील बर्दहान गावची रहिवासी होती. तिचे आजोबा मिर्झापूरच्या विंध्याचल येथे आहेत. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे एका भोजपुरी गायिकायसोबत संबध होते. ती वाराणसीच्या तक्तकपूर भागात भोजपुरी गायकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या आत्महत्येनतंर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता गायक तो त्याच्या खोलीत सापडला नाही. पोलिस अभिनेत्रीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, तिचे शेवटचे बोलणे कोणाशी झाले होते. ती कोणासोबत होती? कोणाच्या पार्टीत गेला होता? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलचे कॉल डिटेल प्रकरणाचे गूढ उकलण्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.