
बाहेरगावी असलेल्या लग्नाविषयी विचारणा करण्यासाठी मोबाईल वर कॉल केल्यानंतर तो कॉल कट न करताच सुरू राहिल्याने धुळ्यातील चौघांचा जातीय द्वेष समोर आला. त्यासंदर्भात मोबाईल मधील कॉल रेकॉर्डींग धुळे शहर पोलिसात सादर केल्याने चौघांविरूध्द ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे(A case has been registered in Dhule against a friend for making racist insults and making offensive statements).
धुळे : बाहेरगावी असलेल्या लग्नाविषयी विचारणा करण्यासाठी मोबाईल वर कॉल केल्यानंतर तो कॉल कट न करताच सुरू राहिल्याने धुळ्यातील चौघांचा जातीय द्वेष समोर आला. त्यासंदर्भात मोबाईल मधील कॉल रेकॉर्डींग धुळे शहर पोलिसात सादर केल्याने चौघांविरूध्द ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे(A case has been registered in Dhule against a friend for making racist insults and making offensive statements).
प्रशांत दिलीप पटाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 22 एप्रिल रोजी बाहेरगावी लग्नाला जात असतांना धुळ्यातील विट व्यावसायिक असलेल्या मयूर मोरे याचा कॉल आला प्रशांत पटाईत यांना आला त्याने लग्न कोठे आहे, केव्हा आहे अशी विचारणा केली. तसेच आम्हीही लग्नाला येण्यासाठी तुमच्या मागे निघालो असल्याचे सांगितले. मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर दोघांनीही कॉल कट न करताच तसेच खिशात मोबाईल ठेवले. त्यानंतर मयूर मोरे व सोबत असलेल्या बंटी मोरे, कैलास मोरे, मनोज मोरे या चौघांमध्ये लग्नाच्या विषयावर तसेच जातीवाचक आक्षेपार्ह बोलणे सुरू झाले. कॉल कट न झाल्याने त्यांचे हे सर्व संभाषण कॉल रेकॉर्डमध्ये ध्वनीमुद्रीत होत होते. सुमारे 15 मिनीटे 45 सेकंद हा कॉल सुरू होता. या कॉलची रेकॉडींग प्रशांत पटाईत यांनी रात्री घरी आल्यानंतर झोपण्याच्यावेळी शांतपणे ऐकली. तेव्हा मयूर मोरे याच्यासोबत असलेल्या चौघांचा जातीय द्वेष समोर आला.
या रेकॉर्डींगमध्ये मयूर मोरे याने जातीवाचक तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले असून त्यासोबत असलेले तिघेजण समर्थन देतांना स्पष्ट होत आहे. यामुळे प्रशांत पटाईत यांनी ही रेकॉर्डींग थेट धुळे शहर पोलिसात सादर करीत फिर्याद दाखल केली. यानुसार मयूर मोरे (भोई), बंटी विजय मोरे (दोन्ही रा. भोईवाडा मोगलाई, धुळे, कैलास मोरे (भोई) व मनोज मोरे (भोई) यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.