मुलगी की कैदाशीण? आईच्या मृतदेहाचे तुकडे करताना एकदाही हात थरथरला नाही? 3 महिने मृतदेहाचे तुकडे घरातल्या कपाटात, लालबाग हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती

लालबागच्या पेरु कम्पाऊंडमध्ये रिपुल आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रिपुलनं आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्यानंतर तिचे दोन्ही हात आणि पाय कापले असल्याचं समोर आलं आहे. शरीराचे इतरही भाग कापण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी कटर आणि छोट्या चाकूंचा वापर करण्यात आल्याचंही समोर आलंय.

मुंबई– मुंबईच्या लालबाग (Lalbaug) परिसरात एका 23 वर्षीय तरुणीनं आपल्या सख्ख्या आईची (Mother) हत्या (murder) करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती. त्याच प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. या तरुणीनं आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिकच्या बॅगेते भरले होते. मात्र तिचा गुन्हा अखेरीस उघडकीस आलाच. इतकंच नाही तर या महिलेची हत्या डिसेंबर 2022 मध्ये झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. म्हणजे गेले 3 महिने या तरुणीनं आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे घरातल्या कपाटात ठेवले असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. आता या 23 वर्षीय तरुणीला पोलिसांनी हत्येच्या संशयावरुन अटक केली आहे. रिपुल प्रकाश जैन असं या तरुणीचं नाव आहे.

आईच्या मृतदेहाचे हात, पाय कापले

लालबागच्या पेरु कम्पाऊंडमध्ये रिपुल आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रिपुलनं आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्यानंतर तिचे दोन्ही हात आणि पाय कापले असल्याचं समोर आलं आहे. शरीराचे इतरही भाग कापण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी कटर आणि छोट्या चाकूंचा वापर करण्यात आल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी घरातून एक करवत, कटर आणि छोटा चाकू जप्त केला आहे. मृत महिलेचं नाव वीणा प्रकाश जैन असं असून त्यांचं वय फक्त 55 वर्ष होतं.

विरारमधून लालबागमध्ये राहायला आले

ही मृत महिला, पती आणि मुलगी रिंपल यांच्यासह विरारमध्ये राहत होत्या. 16 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर हे कुटुंब लालबागमध्ये इब्राहिम कसार चाळीत शिफ्ट झालं. मृत वीणा जैन यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असल्याची माहितीही समोर आली आहे.

बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर प्रकार समोर

वीणा जैन या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलासंनी लालबागमधील त्यांच्या घरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांच्या घराच्या वेगवेगळ्या भागातून प्लास्टिकच्या पिशवीत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना मिळाले आहेत. हा घृणास्पद प्रकार केल्याप्रकरणी वीणा जैन यांची 23 वर्षांची मुलगी रिंपल हिला अटक करण्यात आलीय.