भर रस्त्यात नराधम फाडत होता तरुणीचे कपडे, शेजारी उभी असलेली आई पाहतच राहिली, इतर महिलांनी प्लास्टिकने झाकून वाचवली आब्रू!

हैदराबादमध्ये एक नरधम तरुणीचा विनयभंग करत होता. तिने विरोध करताच नराधमाने तिला रस्त्याच्या मधोमध नग्न केले. ती महिला काही वेळ रस्त्यावर सर्वांसमोर कपड्यांशिवाय राहिली. इतर महिलांनी मदत करून तिचे शरीर प्लास्टिकच्या चादरीने झाकले.

  हैदराबाद: देशभरात महिलांच्या संदर्भातील गुन्हे (Crime) घडण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, केरळ या राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचारावरील घटना घडल्याचं समोर आलं आहे. आत हैरदराबादमधूनही एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हैदराबादच्या जवाहर नगर भागात एका नराधमान आधी एका तरुणीला रस्त्याच्या मधोमध विनयभंग (Molestation) केला. तरुणीने विरोध करताच त्याने तिचे कपडे फाडून तिलं नग्न केलं. (Man Strips Woman On Road) आश्चर्य म्हणजे त्या माथेफिरुची आई त्यावेळी तिथचं उभी होती पण तिने आपल्या मुलाला विरोध केला नाही आणि जवळच उभी राहून सगळ प्रकार पाहत राहिली. या दरम्यान काही महिलांना येऊन त्या तरुणीच्या अंगावर प्लास्टिक टाकून तिचं शरीर झाकलं.

  नेमका प्रकार काय?

  मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या जवाहर नगर परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास एक तरुणी कपड्यांच्या दुकानातून परतत होती. परतत असताना रस्त्यात एका आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मुलीने विरोध केल्यावर तो आणखी आक्रमक झाला. त्याने भरस रस्त्यात मुलीचे कपडे फाडले आणि तिला नग्न केले.दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नंतर कोणीतरी ती सोशल मीडियावर पोस्ट केली. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला पकडले.

  महिलांनी प्लास्टिक टाकून झाकलं युवतीला

  स्कूटीवरून जाणाऱ्या एका महिलेने या बदमाशाने केलेल्या अत्याचाराला आक्षेप घेत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्या नराधमाने त्या महिलेशीही भांडण सुरू केले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपीला ताब्यात घेतले. यादरम्यान महिला रस्त्याच्या मधोमध काही वेळ विवस्त्र पडून राहिली. इतर महिलांनी तिला मदत केली आणि तिचे शरीर निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या चादरीने झाकले.

  जवळ उभी असलेली आई मुलाची गुंडगिरी पाहत राहिली

  या संपूर्ण घटनेदरम्यान आरोपीसोबत उपस्थित असलेली त्याची आई शेजारी उभ्या राहून आपल्या मुलाचं कृत्य पाहत राहिली. पण तिने आपल्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही आणि पिडित तरुणीचे रक्षणही केले नाही. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी IPC कलम 354(b), 323, 506 r/w 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही आईवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.