
केरळ उच्च न्यायालयात 31 वर्षीय व्यक्तीने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसमोर हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने केरळ उच्च न्यायालयात खळबळ उडाली आहे.
प्रेमात (Love) लोकं जीवही द्यायला तयार होतात असं म्हण्टलं जात. प्रियकर किंवा प्रेयसी आपल्यापासून दूर नाही जायलं हंव यासाठी प्रसंगी अनेक प्रेमवीर असं स्व:तचा जिव घेण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक घटना सध्या केरळमध्ये घडली आहे. एका 31 वर्षीय व्यक्तीने थेट उच्च न्यायालयातील (Kerala High Court) न्यायाधीशांसमोर हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि त्याने नेमकं असं का केलं? जाणून घ्या.
नेमकं प्रकरण काय?
प्रकरण केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील आहे. येथे विष्णू नावाच्या व्यक्तीने न्यायमूर्ती अनु शिवरामन यांच्या चेंबरसमोर आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष्णू आणि 23 वर्षीय तरुणी जवळपास महिनाभर एकत्र राहत होते. तरुणीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विष्णूने आपल्या मुलीला बेकायदेशीरपणे कोंडून ठेवल्याचा आरोप केला.
या प्रकरणी सुनावणी सुरू असतान तरुणीने न्यायमूर्ती अनु शिवरामन आणि सी जयचंद्रन यांच्या खंडपीठाला सांगितले की, तिला तिच्या कुटुंबासह जायचे आहे. बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार, तिने न्यायालयात साक्ष दिली की मैत्रीशिवाय तिला विष्णूबद्दल प्रेमाची भावना नाही. हे ऐकल्यानंतर विष्णूने संतापाच्या भरात स्वताच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुनावणीनंतर विष्णूने खिशातून चाकू काढला आणि मनगट कापले. पोलिसांनी त्याला थांबवून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
विष्णू देत होत धमकी
तरुणीने न्यायालयात त्याच्यासोबत राहत असल्याची बाब स्विकारली. मात्र, पुढे सांगितले की, त्याला सोडून गेल्यास तो तिला जीव घेण्याची धमकी दिल्यानेच ती त्याच्यासोबत राहिली. कोर्टात महिलेने केलेल्या याचिकेनुसार, विष्णूचे आधीच दुसऱ्या महिलेशी लग्न झाले होते आणि त्याने आपल्याला सांगितले होते की, त्याचे त्याच्या पत्नीसोबतचे नाते संपले आहे. मात्र, कुटुंबियांनी त्याच्या विरोधात खटला दाखल केल्यानंतर तिने पालकासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच. तिने न्यायमूर्ती अनु शिवरामन आणि सी जयचंद्रन यांच्या खंडपीठाला सांगितले की तिला तिच्या कुटुंबासह जायचे आहे. बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार, तिने न्यायालयात साक्ष दिली की मैत्रीशिवाय तिला विष्णूबद्दल प्रेमाची भावना नाही. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने न्यायालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.