स्वतःला पेटवून तरुणीलाही जाळणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले होते.

    औरंगाबाद : प्रेमप्रकरणात मिळालेल्या नकारामुळे आलेल्या नैराश्यातून स्वतःला जाळून  घेत तरुणीलाही जाळणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत तरुण 70 टक्के भाजला होता तर  तरुणी 20 टक्के भाजली होती. दोघांवरीही घाटी रुग्णलयात उपचार सुरु होते.

    औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे आणि पूजा साळवे यांच्यात प्रेमप्रकरण होते. त्यांच्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरू असल्याने त्याने तीला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल दुपारी घडली. महाविद्यालयात  दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले होते.