
आरोपीने आधी मद्यधुंद अवस्थेत असताना महिलेला जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर महिलेने त्याला चावा घेतला. यामुळे तो संतापला आणि त्याने महिलेचे डोके भिंतीवर तीन ते चार वार केले आणि तिच्या डोक्यावर लहान सिलेंडरने वार करून तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर शारिरीक अत्याचार केला
देशात महिला, मुली कुठंच सुरक्षित नसल्याचं वांरवांर घडणाऱ्या गुन्ह्यांवरुन सिद्ध होत आहे. गेल्या काही दिवसात दिल्ली, मध्यप्रदेशमध्ये, उत्तरप्रदेश, बिहारमध्ये महिला अत्याचारावरील घटना समोर आल्या आहेत. नुकतचं केरळमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. आता उत्तराखंडमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेहराडूनमधे एका तरुणाने महिलेची हत्या (Murder) करून तिच्या मृतदेहावर शारिरीक अत्याचार (Rape With Dead Body)केला आणि मृतदेह डस्टबिनमध्ये टाकून फरार झाला. डस्टबिनमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दारूच्या नशेत शारिरिक अत्याचाराचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि २४ तासांत आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी आश्चर्यकारक खुलासे केले, जे ऐकून पोलीसही थक्क झाले. आरोपीने सांगितले की, त्याने दारूच्या नशेत महिलेची हत्या तर केलीच पण तिच्यावर शारिरिक अत्याचारही केला. महिलेच्या डोक्यावर आणि पायावर खोल जखमेच्या खुणा आढळल्या आहेत.
खून केल्यानंतर मृतदेहावर शारिरिक अत्याचार
आरोपी राजेश हा डेहराडूनमधील सुलभ शौचालयात कर्मचारी आहे. रविवारी रात्री रेल्वे स्थानकाजवळील एका दारूच्या दुकानात तो एका महिलेला भेटला. दोघांनी मिळून दारू पिण्याचा प्लॅन केला आणि आरोपी तिला आपल्या खोलीत एकत्र दारू पिण्यासाठी घेऊन गेला. जिथे दोघे बसून दारू प्यायले. नंतर आरोपी राजेशने मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला विरोध करत चावा घेतला. यामुळे तो संतापला आणि त्याने महिलेचे डोके भिंतीवर आपटले तसेच डोक्यावर लहान सिलेंडरने वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहासोबत शारिरिक अत्याचार केला.
पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली
सकाळी जेव्हा आरोपीचे डोळे उघडले आणि नशा उतरली तेव्हा त्याला ती महिला मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो डस्टबिनमध्ये टाकून तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली असून त्याच्याव 376 सह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.