कुर्ला हत्याकांडाचं गुढं उकललं, महिलेची तिच्या लिव्ह इन पार्टनरने केली हत्या!

ही माहिला धारावी परिसरात लिव्ह इन रिलनेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पुढे तसेच तिच्या प्रियकरावेच तिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

  मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात मेट्रोच्या बांधकामाजवळ एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने (Dead Body Found In Suitcase) खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठं अपडेट समोर आलं आहे. ही धारावी परिसरात महिला लिव्ह इन मध्ये राहत होती. चारित्र्याच्या संशयावरुन तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  काल कुर्ला परिसरात आढळला होता मृतहेह

  सोमवारी मुंबईच्या कुर्ला भागातील शांती नगर परिसरातील सीएसटी रोडवरील मेट्रो बांधकाम साइटजवळ एका बॅरिकेडजवळ एका सुटकेस पडून होती. पोलिसांनी सुटकेस उघडली असता त्यात एका महिलेचा मृतदेह सापडला  होता.  या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्या सूटकेसमधून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढून नागरी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. आता फॉरेन्सिक तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटलेली आहे. ही माहिला धारावी परिसरात लिव्ह इन रिलनेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पुढे
  तसेच तिच्या प्रियकरावेच तिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

  महिलेने टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातला होता

  मिळालेल्या माहितीनुसार,  पोलिसांनी सुटकेस जप्त करुन मृतदेह बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी नागरी रुग्णालयात पाठवण्यात आला होता.  अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, महिलेने टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातला होती.