
दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा संशय तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. प्रेशर कुकरने त्याने तिचे डोके फोडले. यात तीचा जागीच मृत्यू झाला. दोघेही लवकरच लग्न करणार होते.
संशयाच (Doubt) भुत एकदा अंगात घुसलं की ते वर्षानुवर्षे असलेल्या नात्याला काही क्षणात संपवतो. पार्टनरवर असलेल्या संशयाच्या भुताला वेळीच पळवून लावलं नाही तर त्यामुळे नातं तर तुटतचं पण प्रसंगी असा प्रकार हा गुन्ह्यालाही जन्म देतो. असाच काहीसा विचित्र प्रकार बंगळुरूमधून (Bangalore) समोर आला आहे. दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची प्रेशर कुकरने वार करत हत्या (Man Killed his Live In Partner With Pressure Cooker) केली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या बांगूरमधील न्यू मायको लेआउटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे हत्याकांड झालं आहे. वैष्णव आणि त्याची लिव्ह इन पार्टनर देवी हे दोघेही अनेक दिवसापासून एकत्र राहत होते. वैष्णव आणि देवी मध्ये आधी कडाक्याचं भांडण झालं. त्यांनतर रागाच्या भरात वैष्णवने देवीच्या डोक्यात कुकुर घातला. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दोघेही लवकरच लग्न करणार होते
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णव आणि देवी कॉलेजच्या दिवसांपासून मित्र होते. दोघेही केरळचे असून नोकरीच्या शोधात बेंगळुरूला आले होते. दोघेही खासगी कंपनीत काम करू लागले आणि एकत्र राहू लागले. वैष्णव केरळमधील कोल्लमचा रहिवासी असून बंगळुरुत एका स्थानिक कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तर देवीही एका कंपनीत काम करत होती. दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या नात्याची माहिती होती. अनेकदा दोघांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येत असत. रिपोर्ट्सनुसार, दोघेही लवकरच लग्न करणार होते.
दोघांमध्ये होत होती भांडण
सुरुवातीचे काही दिवस गोडीगुलाबीने गेल्यानंतर वैष्णवला त्याची लिव्ह-इन पार्टनर देवीवर संशय येत होता की तिचे कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. यावरून त्याच्यांत नेहमी वाद होत होता. शनिवारी सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात वैष्णवने प्रेशर कुकरने देवीचे डोके फोडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बेगूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.