raped in khed

मुळशी तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समजपत्र देऊन मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे.

    पिंपरी :  मुळशी तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समजपत्र देऊन मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे. विनयभंग करणारा मुलगा अल्पवयीन असून याबाबत पीडीत मुलीच्या वडिलांनी ही फिर्याद दिली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 11 जून ते 18 जुनच्या रात्री 7 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. आरोपीने गेल्या आठ दिवसांपासून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याच्या हेतूने मुलीच्या घरी कोणीच नसताना तिच्या घरी जाऊन वारंवार शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. प्रसंगी फोनवरून संपर्क करून कन्नड भाषेतील अश्लील शिव्या दिल्या. याप्रकरणी आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 452, 354(ड), 509, 323 व लैंगिक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आरोपीचे वय लक्षात घेता पोलिसांनी संबंधित मुलाला समजपत्र देऊन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे.