वर्धा येथील दुर्घटना; ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडले

समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वरच्या खंडाळा शिवारात महामार्ग पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी उभ्या असलेल्या एका गाडीला ट्रकने मागून धडक दिली आणि हा ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला आणि पुढे जात दुभाजकावर चढला.

    नागपूर – वर्धा (Wardha) येथे एका ऑन ड्युटी वाहतूक पोलीस (On Duty Traffic Police) कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ध्यातल्या खंडाळामध्ये ही घटना घडली. ट्रकने (Truck) दिलेल्या जबर धडकेत या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे. गौरव खरवडे असे त्यांचे नाव आहे.

    समुद्रपूर (Samudrapur) तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वरच्या खंडाळा शिवारात महामार्ग पोलीस (Highway Police) कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी उभ्या असलेल्या एका गाडीला ट्रकने मागून धडक दिली आणि हा ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला आणि पुढे जात दुभाजकावर चढला.

    दुर्घटनेत गौरव खरवडे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालक सुनील ढोणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवडे आपल्या दहा सहकाऱ्यांसह महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांचा अपघात झाला.