पनवेल न्यायालयात आरोपीचा पोलिसांवर हल्ला; घरी सोडण्याचा हट्ट

संशयित आरोपी संतोष याला कोरोनाकाळात पत्नीच्या खूनाप्रकरणी अटक केली आहे. कोरोना संसर्गामुळे संतोषला विलगीकरणात ठेवले होते. संतापलेल्या संतोषने तिचा खून केला होता. संतोष याच्यावर पुन्हा एकदा पोलीस कर्मचा-यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ४२ वर्षीय संतोष पाटील या संशयित आरोपीला घेऊन पोलीस कर्मचारी ओंकार ठाकरे हे पनवेल न्यायालयात आले होते.

    पनवेल – न्यायालयाने सुनावणीदरम्यान संशयित आरोपीला ८ डिसेंबर ही पुढील तारीख दिली. मात्र, त्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात न राहता घरी जायचे होते. त्यामुळे वैतागलेल्या संशयित आरोपीने (Suspect Accused) पोलिसालाच मारहाण (Beating Police) करण्यास सुरुवात केली. पनवेल येथील न्यायालयात (Panvel Court) पहिल्या मजल्यावर महिला वकिलांच्या कक्षाबाहेर ही घटना घडली.

    संशयित आरोपी संतोष याला कोरोनाकाळात (Covid 90) पत्नीच्या खूनाप्रकरणी (Wife Murder Case) अटक केली आहे. कोरोना संसर्गामुळे संतोषला विलगीकरणात ठेवले होते. संतापलेल्या संतोषने तिचा खून केला होता. संतोष याच्यावर पुन्हा एकदा पोलीस कर्मचा-यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ४२ वर्षीय संतोष पाटील या संशयित आरोपीला घेऊन पोलीस कर्मचारी ओंकार ठाकरे हे पनवेल न्यायालयात आले होते.

    न्यायमूर्तींनी संतोषला ८ डिसेंबर ही तारीख दिल्याने पहिल्यामजल्यावरुन जात असताना संरक्षक भिंतीजवळ आल्यावर तळोजा कारागृहात जाण्यापेक्षा त्याला घरी पाठवावे असा हट्ट पोलिसांसमोर केला. पोलीस व संतोष यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. संतोषने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांचा गणवेश सुद्धा फाडण्याचा प्रयत्न संतोषने केला. पोलीसाला जखमी केल्याने संतोषवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.