Accused commits suicide at Roha police station

रोहा पोलीस ठाण्यात आरोपीने आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने चादरीने घेतला गळफास घेतला आहे (Accused commits suicide at Roha police station).

  रोहा पोलीस ठाण्यात आरोपीने आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने चादरीने घेतला गळफास घेतला आहे (Accused Commits Suicide at Roha police station).

  रवी वाघमारे असे मृत आरोपीचे नाव आहे. लॉकअपच्या शौचालयात जाऊन खिडकीला चादरीचा गळफास बनवून त्याने आत्महत्या केली.

  या प्रकरणातील आरोपी रवी वाघमारे याने त्याची स्वतःची पत्नी जयश्री हिचा खून केल्याने त्याला रोहा पोलिसांनी अटक केली होती. ११ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीसाठी आरोपीला पोलिस कस्टडी देण्यात आली होती. परंतु पहाटेच्या सुमारास शौचालयात जाऊन चादरीचा दोर बनवून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

  सदर घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टिमला पाचारण करण्यात आले असून सदर घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीने स्वतःच्या पत्नीची हत्या केली व स्वतः देखील गळफास लावून मरण पत्करले.

  पण यामुळे त्यांची सागर वय १० वर्ष, सोमनाथ वय ६ वर्ष, रंजना वय ४ वर्ष आणि अजय वय दिड वर्ष ही चार मुले अनाथ झाली आहेत. या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी तहसीलदार रोहा यांच्या कडे करण्यात आली असता त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

  जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, तहसीलदार कविता जाधव, रोहा न्यायालयाचे न्यायाधीश यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा सर्व बाजूने सखोल तपास करून दोषींना शासन केले जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधिक्षक दुधे यांनी दिली आहे.