शरयू एक्सप्रेस प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, महिला कॉन्स्टेबलवर केला होता हल्ला!

यूपी एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांनी सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अनीस याला चकमकीत ठार केले.

    अयोध्या : यूपी एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांनी शरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक (Sharyu Express case) हल्ल्यातील मुख्य आरोपी अनीस याला चकमकीत ठार केले आहे. तरअनिशचे आणखी दोन साथीदार आझाद आणि विशंभर दयाळ उर्फ ​​लल्लू यांना अयोध्येतील इनायतनगर येथून चकमकीनंतर अटक करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेला मुख्य आरोपी अनीस ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करत होता. त्याच्यासह अन्य दोन आरोपींनी महिलेवर जीवघेणा हल्ला केला. रेल्वेच्या खिडकीला डोके आपटून महिलेला गंभीर दुखापत झाली. तिचा चेहरा पुर्णपणे रंक्तबंबाळ  झाला होता. अयोध्येपूर्वी ट्रेनचा वेग कमी झाला तेव्हा तिन्ही आरोपी पळून गेले होते. शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांच्यावर  एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होत.ं

    अयोध्या शरयू एक्स्प्रेस प्रकरण काय?

    शरयू एक्स्प्रेसमधे तीन आरोपींनी महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होत. त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन साथीदारही होते. तिने प्रतिकार केला. मात्र, त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर हल्ला केला यावेळी ती गंभीररित्या जखमी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून यूपी एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र,पोलिसांचे हाती काहीही लागले नव्हते. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोंपीचा शोध घेण्यात येत होता. अलाहाबाद हायकोर्टाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली होती.