
ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत त्याने अनेकदा अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने तिचा गर्भपात केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नवी दिल्ली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) यांनी तारणहाराऐवजी भक्षक म्हणून काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. आरोपी दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात वरिष्ठ अधिकारी आहे. ज्या अधिकाऱ्याने महिला आणि बालकांच्या हितासाठी काम करायचे आहे आणि त्यांचे रक्षण करायचे आहे, त्याने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिने शारिरिक अत्याचार केला. हे प्रकरण काल समोर आल्यानंतर अखरे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित मुलगी 14 वर्षीची असून बारावीची विद्यार्थिनी आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. तिचे वडील आरोपीचे मित्र होते. आरोपी महिला व बालविकास विभागात उपसंचालक होते. आरोपीने मुलीला आपल्या घरी आणले होते. यानंतर त्याने मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने पत्नीच्या मदतीने मुलाचा गर्भपात केला. आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत मुलीवर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप आहे.
आरोपीच्या पत्नीवरही गुन्हा दाखल
हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपीच्या पत्नीचे नावही आरोपी म्हणून नोंदवले आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरण उघडकीस कसं आलं
सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी मानसिक आजारी होती. तिला आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी मुलीचे मानसशास्त्रीय समुपदेशन केले. यानंतर मुलीने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर ती वडिलांच्या मित्राच्या घरी राहू लागली. ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत त्याने अनेकदा अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने तिचा गर्भपात केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.