अभिनेता अरमान कोहलीला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा, वर्षभराच्या कारावासानंतर जामीन मंजूर

एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यादरम्यान त्याच्या घरातही काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. मात्र वर्षभरानंतर आज अरमान कोहलीला (Armaan Kohli) दिलासा मिळाला आहे. वर्षभराच्या कारावासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीने दाखल केलेल्या एनडीपीएसच्या (NDPS) खटल्यात १ लाखांच्या जामीनावर अरमान कोहलीची सुटका करण्यात आली आहे.

    मुंबई : बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला (Armaan Kohli) एनसीबीनं मागील वर्षी अटक होतं. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने (NCB) अरमानवर ड्रग्ज सेवनाचे (Drugs) अनेक मोठे आरोप असल्याचे सांगितले होते. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यादरम्यान त्याच्या घरातही काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. मात्र वर्षभरानंतर आज अरमान कोहलीला (Armaan Kohli) दिलासा मिळाला आहे. वर्षभराच्या कारावासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीने दाखल केलेल्या एनडीपीएसच्या (NDPS) खटल्यात १ लाखांच्या जामीनावर अरमान कोहलीची सुटका करण्यात आली आहे.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून चांगलाच अडचणीत आला आहे. मागील सुनावणी वेळी एनडीपीएस प्रकरणात अरमानला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळं त्याच्या अडचणीत वाढ होऊन जवळपास एक वर्षाचा तुंरुगवास अरमान कोहलीला भोगावा लागला आहे. आज त्याला दिलासा मिळाला असून, एनसीबीने दाखल केलेल्या एनडीपीएसच्या खटल्यात १ लाखांच्या जामीनावर अरमान कोहलीची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, २०१८ मध्ये अरमान कोहलीवर  त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. एका महिला फॅशन डिझाईनरशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणीही अरमानवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.