तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी!

शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून शीझानचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सीझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

    मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शनिवारी गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट येत आहे. तिच्या आत्महत्ये प्रकरणी अभिनेता शिझान मोहम्मद खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सीझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून शीझानचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच अन्य कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नसल्याच त्यांनी सांगितल. दरम्यान, तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र,  तुनिषाच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत. तिची काकू परदेशात राहत असल्याने तिला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार उद्या किंवा परवा होतील.

    शवविच्छेदन अहवालात काय

    तुनिषा शर्माच्या आत्महत्तेच्या वृत्ताने सगळीकडे खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. तुनिषाच आज जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून त्याच अहवालही समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. तुनिषाचे पोस्टमॉर्टम रविवारी सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, तुनिषा शर्माचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा जखम आढळलेली नाही, तसेच तुनिषा शर्माच्या गर्भवती असल्याचंही वृत्त पोलिसांनी फेटाळलं आहे.

    मेकअपरुम केली आत्महत्या

    तुनिषाने शनिवारी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तनुशीच्या आईने शीजानवर गंभीर आरोप केले आहेत. शीजानवर नाराज होऊन तुनिषाने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,  पोलिसांनी सेटवर उपस्थित सर्व लोकांची चौकशीही केली होती. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.