अभिनेत्री आकांक्षा आत्महत्या प्रकरण: समर सिंहविरोधात लुकआउट नोटीस, मुंबई-पाटणा येथे छापे

आकांक्षा दुबेला न्याय मिळावा या मागणीसाठी तिची आई आणि भावासह अनेक क्शनि समर्थक आणि नातेवाईक वाराणसीच्या सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आईने समर सिंह आणि त्याच्या भावावर मुलीच्या हत्येचा आरोप समर सिंगला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी (Akanksha Dubey Suicide) रोज नवी माहिती समोर येत आहे. आकांक्षाच्या आईने भोजपुरी गायक समर सिंग (Samar Singh)आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्याविरुद्द गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस कसून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी गायक समर सिंहविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्याची माहिती समोर येत आहे. समर सिंग  अद्याप फरार असून तो परदेशात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांकडून समर सिंहचा शोध सुरू

आकांक्षा दुबेची आई मधु दुबे (Madhu Dubay) यांनी केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  मुंबई, पाटणा व्यतिरिक्त वाराणसी आणि आझमगडमध्ये पोलिसांची अनेक पथके छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.  लवकरात लवकार त्यांला अटक करण्याची मागणी  करण्यात येत आहे. 

आकांक्षाच्या आईचे गंभीर आरोप

आकांक्षाची आई मधूने आरोप केला की, 21 मार्च रोजी आकांक्षा बस्तीमध्ये शूटिंग करत होती. त्यानंतर संजय सिंहने आकांक्षा यांच्या मोबाईलवर फोन केला. तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. शनिवारी संध्याकाळी आकांक्षाशी बोललो मधु दुबे यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे आकांक्षाशी बोलणे झाले. त्या काळात ती आनंदी होती. ती नाराज वाटत  नव्हती. पार्टीत जाण्याबाबत कोणतीही माहिती दिली. पण, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा शनिवारी रात्री पार्टीला गेली होती. एखादा माणूस पार्टीत आंनदाने जातो आणि आनंदाने येतो,  मग तो फाशीने मरतो का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, माझी मुलगी धाडसी होती. असा आत्महत्येचा विचार त्याच्या मनात कधीच येत नव्हता. समर आणि त्याच्या भावाने मिळून आपल्या प्रतिभेच्या जोरावर अभिनय क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं त्यांनी आरोप केला. 

नातेवाईक आक्रमक

दरम्यान, आकांक्षा दुबेला न्याय मिळावा या मागणीसाठी तिची आई आणि भावासह अनेकजण नातेवाईक वाराणसीच्या सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आईने समर सिंह आणि त्याच्या भावावर मुलीच्या हत्येचा आरोप समर सिंगला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.