राग अनावर झाल्याने श्रद्धाची हत्या केली, आरोपी आफताबची साकेत कोर्टात कबुली

आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आफताबनं दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली

    नवी दिल्ली : सध्या दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha walkar Murder Case) हत्या प्रकरण चांगलच गाजतयं. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताबने (Aftab Poonawala)तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं.

    संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपी आफताब पूनावालाची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी रोज नवे नवे धक्कादायक खुलासे होत होते. आज पोलिसांनी आफताबला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टात कबुल केलं आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आफताबनं दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

    नेमकं काय म्हणाला आफताब

    साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालानं न्यायालयात सांगितलं की, “घटना क्षणार्धातच घडली. तपासात सहकार्य करत असल्याचंही त्यानं कोर्टाला सांगितलं. तसेच पुढे बोलताना मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही त्यांनं कोर्टाला सांगितलं.