एका भोजपुरी गायकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आकांक्षा दुबे, आता कॉल डिटेलमुळे उलगडणार तिच्या आत्महत्येचं गूढ

आकांक्षाचे एका भोजपुरी गायिकायसोबत संबध होते. ती वाराणसीच्या तक्तकपूर भागात भोजपुरी गायकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey Suicide) हिने काल वाराणसीतील एका हॅाटेलमध्ये आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस तपासाता अनेक बाबी समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा वाराणसीच्या तक्तकपूर भागात एका भोजपुरी गायकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या नात्यात तणाव असल्यामुळे ती नैराश्यात गेल्याची माहिती समोर आली आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आकांक्षा

आकांक्षा ही मूळची भदोही येथील चौरी बाजार परिसरातील बर्दहान गावची रहिवासी होती. तिचे आजोबा मिर्झापूरच्या विंध्याचल येथे आहेत. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे एका भोजपुरी गायिकायसोबत संबध होते. ती वाराणसीच्या तक्तकपूर भागात भोजपुरी गायकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या आत्महत्येनतंर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता गायक तो त्याच्या खोलीत सापडला नाही. पोलिस अभिनेत्रीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, तिचे शेवटचे बोलणे कोणाशी झाले होते. ती कोणासोबत होती? कोणाच्या पार्टीत गेला होता? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलचे कॉल डिटेल प्रकरणाचे गूढ उकलण्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

हॅाटेलमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाने वाराणसी येथील शैलेंद्र हॉटेलमध्ये अभिनेत्रीने गळफास लावून घेतला आहे. मात्र, हॉटेलच्या रुममध्ये तिचा मृतदेह आढळुन आला होता. या नंतर पोलिसांना मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला.

शनिवारी पार्टी रविवारी सुसाईड

शनिवारी उशिरा आकांक्षा एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. पार्टीवरुन परतल्यानंतर तिने रविवारी सकाळी हॅाटेलच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. खूप प्रयत्नांनंतर जेव्हा मास्टर चावीने दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहुन सगळीकडे एकच खळबळ उडाली. पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती हॅाटेलच्या कर्मचाऱ्यांना आढळली. 

आकांक्षाला हॉटेलमध्ये सोडायला आला एक तरुण

सारनाथ भागातील एका हॉटेलमधून वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचे सांगून आकांक्षा शनिवारी रात्री आठच्या सुमारास कॅबमधून बाहेर पडली. हॉटेलचे जनरल मॅनेजर रितेश कुमार मेहता यांनी सांगितले की, आकांक्षा हॉटेलमध्ये आली नशेत असल्याचं दिसत होतं. तिच्यासोबत काळा शर्ट घातलेला सुमारे 25 वर्षांचा तरुण होता. तरुणाने तिला मदत केली आणि खोलीत नेले. हा तरुण सुमारे 17 मिनिटे आकांक्षाच्या खोलीत थांबला, नंतर बाहेर आला आणि निघून गेला. यानंतर आकांक्षाच्या खोलीचे लाईट्स बंद झाले. पोलीस आता त्या तरुणाचा शोध घेत आहेत.