‘माझी मुलगी धाडसी होती, आत्महत्येचा विचार तिच्या मनात येणं शक्य नाही,’ आकांक्षाच्या आईनं रडत रडत पोलिसांना सांगितलं, तर समर सिंगने हत्येची धमकी दिल्याचाही केला आरोप

भोजपुरी अभिनेत्रीची आई मधु दुबे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायक समर आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.मधू दुबे म्हणाल्या की, मुलगी धैर्यवान होती. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ती नव्हती.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी (Akanksha Dubey Suicide) रोज नवी माहिती समोर येत आहे. आकांक्षाच्या आईने भोजपुरी गायक समर सिंग (Samar Singh)आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्याविरुद्द गुन्हा दाखल केल्यानंतर  रोज नवे नवे खुलासे होत आहेत. मधु दुबे (Madhu Dubay) यांनी आरोप केला की, समर अनेकदा आकांक्षाला मारहाण करत असे. पैसे हडप करायचे. त्याला इतर कुणासोबत काम करण्याची परवानगी करु देत नव्हता तसेच ती दुसऱ्या कोणाकडे काम करायची तेव्हा तो तिला त्रास देत होता. 

काय म्हणाली आकांक्षाची आई

आकांक्षाची आई मधूने आरोप केला की, 21 मार्च रोजी आकांक्षा बस्तीमध्ये शूटिंग करत होती. त्यानंतर संजय सिंहने आकांक्षा यांच्या मोबाईलवर फोन केला. तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. शनिवारी संध्याकाळी आकांक्षाशी बोललो मधु दुबे यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे आकांक्षाशी बोलणे झाले. त्या काळात ती आनंदी होती. ती नाराज वाटत  नव्हती. पार्टीत जाण्याबाबत कोणतीही माहिती दिली. पण, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा शनिवारी रात्री पार्टीला गेली होती. एखादा माणूस पार्टीत आंनदाने जातो आणि आनंदाने येतो,  मग तो फाशीने मरतो का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, माझी मुलगी धाडसी होती. असा आत्महत्येचा विचार त्याच्या मनात कधीच येत नव्हता. समर आणि त्याच्या भावाने मिळून आपल्या प्रतिभेच्या जोरावर अभिनय क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं त्यांनी आरोप केला. 

समर सिंहवर गुन्हा दाखल

दरम्यान, आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येप्रकरणी सारनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आकांक्षाला हॅाटेलवर सोडणाऱ्या युवकाची होणार चौकशी 

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे  शनिवारी रात्री उशिरा महमूरगंज येथून आकांक्षाला सारनाथ भागातील एका हॉटेलमध्ये सोडण्यात आलेल्या तरुणाच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. आकांक्षाच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सनुसार ती टिकरी येथील तरुणाशी बोलत होती. आकांक्षाच्या मृत्यूतील त्याचीही कसुन चौकशी करण्यात येत आहे.