मुलानं आंतरजातीय विवाह केल्यानं संतप्त पित्याने मुलाची केली हत्या, अकोल्यात ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक प्रकार!

घरातून वाढता विरोध लक्षात घेता संदीप आणि त्याची प्रेयसीने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं. त्यानंतर संदीपच्या वडिलांनी त्याची हत्या केली. 

    अकोला: एकीकडे अनेक राज्यातील सरकार आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत असतात तर दुसरीकडे पुरोगामी म्हण्टल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून पालक कृर होत आपल्याला पाल्याचा जीव घेतात. असाच एक प्रकार अकोला येथून उघडकीस आहे आहे. जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना (Akola Honour killing) घडली आहे. आपल्या मुलानं दलित मुलीवर  (Inter-caste marriage) प्रेम केल्याच्या रागातून वडिलांनीच दुसऱ्या मुलाच्या मदतीनं पोटच्या मुलाची हत्या केली (Father killed son) आहे. संदीप नागोराव गावंडे (वय 26) असं मृत तरुणाच नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी बापाचं नाव आहे.

    नेमका प्रकार काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घडली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गांवडे हा व्यक्ती राहतो. त्याला दोन मुलं आहेत. मृत मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत काम करतो तर दुसरा मुलगा गावातच काम करतो. संदिपचं गावातीलच एका दलित मुलीवर प्रेम होतं. त्यांने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र संदीपच्या कुटुंबियांना त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. त्याच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. यावरुन बापलेकामध्ये नेहमी वाद होत होते. संदीपच्या वडिलांच्या विरोधामुळे या दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीनं संदीपची हत्या केली.

    मुलाची हत्या करुन झाले गायब

    मृत संदिप ऐकत नसल्याने वडिल खूप संतापले होते. घटनेच्या दिवशीही बापलेकामध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी तो त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्याने सांगतिले. दरम्यान, आधिच संतपलेल्या वडिलांने दुसर मुलग आणि इतर साथीदाराच्या साहाय्याने संदीपची हत्या केली. मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले होते, त्यानंतर शुक्रवारी ते गावात परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.