अकोला-पूर्णा पॅसेंजर रेल्वेसह भाजप खासदाराचे घर बाँम्बने उडवण्याची धमकी

अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल रात्री १० वाजून ४० मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली असून खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

    मुंबई : अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे (Akola-Purna Passenger) आणि अकोल्याचे भाजपचे खासदाराचे (BJP MP Sanjay Dhotre) घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने (Mumbai Police) अकोला पोलिसांना (Akola Police) दिली.

    अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा फोन येताच अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल रात्री १० वाजून ४० मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली असून खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

    काल २६ जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक १७६८३) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली.