
पश्चिम नेपाळमधील कपिलवस्तु येथून अमृतपाल देशात प्रवेश करू शकतो म्हणून साध्या वेशातील पोलिसांनी सीमावर्ती भागात दक्षता वाढवली आहे.
पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला कट्टरवादी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू आहेत. अमृतपाल सिंग नेपाळमध्ये (Nepal) लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत अमृतपालला जर त्याने भारतीय पासपोर्ट किंवा इतर कोणताही बनावट पासपोर्ट वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे.
खलिस्तानचे समर्थन करणारा अमृतपाल अटक वॉरंट जारी झाल्यापासून फरार आहे. पंजाब पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने शनिवारी व्यावसायिक सेवा विभागाला पाठवलेल्या पत्रात येथील विविध सरकारी संस्थांना विनंती केली आहे की, अमृतपालने नेपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्यात यावी. अशी माहिती काठमांडू पोस्ट या वृत्तपत्राने दिली आहे. मात्र, स्थानिक भारतीय मिशनकडून या पत्राबाबत त्वरित पुष्टी मिळालेली नाही. “अमृतपाल सिंग सध्या नेपाळमध्ये लपला आहे.” या संदर्भात त्यांच्या या पत्राची प्रत त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यात करण्यात आला आहे.
अमृतपाल सिंगचा प्रत्येक माहिती दिली
नेक स्त्रोतांचा हवाला देत वृत्तपत्राने म्हटले आहे की, अमृतपाल सिंग यांचे पत्र आणि वैयक्तिक तपशील हॉटेल्सपासून एअरलाइन्सपर्यंत सर्व संबंधित एजन्सींना पाठवण्यात आले आहेत. अमृतपाल सिंग यांच्याकडे वेगवेगळ्या ओळखींचे अनेक पासपोर्ट असल्याचे समजते. पंजाब पोलिसांनी 18 मार्च रोजी अमृतपालवर कारवाई सुरू केली, तेव्हापासून तो फरार आहे. कट्टर फुटीरतावादी अमृतपालने पोलिसांनाही चकमा दिली आणि पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात त्याच्या ताफ्याला रोखण्यात आले तरीही पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला.
भारत-नेपाळ सीमेवर अजूनही हाय अलर्ट कायम
गृह मंत्रालयाने नेपाळ-भारत सीमा भागात सर्व सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत ‘माय रिपब्लिका’ वृत्तपत्राने सांगितले की, भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून हे निर्देश देण्यात आले असून नेपाळ-भारत सीमा भागात दोन दिवसांसाठी ‘हाय अलर्ट’ ठेवण्यात आला आहे.