सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या

गणेश शिंदे हे सहकार विभागात मुंबईतील कार्यालयात लेखाधिकारी असून त्यांना पुण्याला बदली हवी होती. यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यांनी विविध सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. शिंदे यांनी कर्जाचे पैसे सावकारांना दिले असतानासुद्धा त्यांच्यामागे वारंवार तगादा लावला जात होता.

    पुणे : सावकारांच्या (Moneylender) जाचाला कंटाळून सहकार विभागातील (Cooperative Department) अधिकाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) घडला आहे. गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी जयश्री शिंदे (वय-४८) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana) आरोपीविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १९ सप्टेंबर रोजी घडला आहे.

    गणेश शिंदे हे सहकार विभागात मुंबईतील कार्यालयात लेखाधिकारी (Accounts Officer) असून त्यांना पुण्याला बदली हवी होती. यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यांनी विविध सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. शिंदे यांनी कर्जाचे पैसे सावकारांना दिले असतानासुद्धा त्यांच्यामागे वारंवार तगादा लावला जात होता.

    सावकारांच्या जाचाला कंटाळून अखेर गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पुण्यातील फरसखाना पोलिसात सावकरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीषा हजारे आणि एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यांनी गणेश शिंदे यांना लाखो रुपयांची कर्ज २० ते ३० रुपये टक्क्याने दिले होते.

    मृत गणेश शंकर शिंदे यांनी आर्थिक विवंचनेतून वेळोवेळी व्याजाने ८४ लाख ५० हजार रूपये घेतले होते. त्याकारणावरुन आरोपींनी गणेश शिंदे यांचा मानसिक व आर्थिक छळ केला. तसेच, आरोपी पांढरकर भवत यांना एक कोटी रुपयांचे पीएल लोन करुन देण्याचे आश्वासन देवून त्या मोबदल्यात त्यांचेकडून पैसे स्विकारले. मात्र, ऐनवेळी लोन करण्यास नकार दिला.