सत्येंद्र जैन यांचा आणखी एक सीसीटीव्ही व्हायरल, तुरुंगात शाही थाट

मीडियाकडून अजून एक व्हिडीओ! बलात्काऱ्याकडून मालीश घेतल्यानंतर आणि त्याचा फिजिओ थेरपिस्ट असा उल्लेख केल्यानंतर सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवले जाते. केजरीवालजी यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हेत, तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे, असे ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केले आहे.

    नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे (AAP) नेते तथा दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांचा तिहार जेलमध्ये (Tihar Jail) मालीशची (Massage) सेवा घेतानाचा व्हिडीओ शेअर (Video Viral) झाला आहे. त्यानंतर आता भाजपने (BJP) आणखी एक सीसीटीव्ही शेअर केला असून त्यात सत्येंद्र जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेत असतानाचे दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हे सीसीटीव्ही ट्वीट केले. त्यामुळे भाजपकडून ‘आप’ला धक्कातंत्र अवलंबल्याचे दिसते.

    मीडियाकडून अजून एक व्हिडीओ! बलात्काऱ्याकडून मालीश घेतल्यानंतर आणि त्याचा फिजिओ थेरपिस्ट असा उल्लेख केल्यानंतर सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवले जाते. केजरीवालजी यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हेत, तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे, असे ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केले आहे.

    व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन यांच्यासमोर जेवणाची थाळी दिसत आहे. तसेच त्यांच्या सेवेसाठी एक व्यक्ती सतत हजर असते. जेवणाची थाळी आणण्यापासून ते खुर्चीच्या शेजारी कचऱ्याचा डबा ठेवण्यापर्यंत सगळी कामे तो करत आहेत. अगदी सत्येंद्र जैन यांना पाण्याची बाटली देतानाही सीसीटीव्हीत दिसत आहे.