जागेच्या वादातून अंगावर कार घालून महिलेसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, संतापाच्या भरात शेजाऱ्याचंं कृत्य

घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियाने केला आहे.

    अहमदनगर: अनेकदा शेजाऱ्यांसोबत क्षुल्लक गोष्टीवरुन वाद होण्याच्या घटना घडत असतात. कधी कधी असे वाद वाढत जाऊ त्याच पर्यवसन मारहाणीत होताना सुद्धा होताना दिसतं. मात्र, अहमदनगरमध्यो दोन कुटुंबामध्ये असलेल्या वादानं मायलेकराचा जीव गमावला (ahmednagar murder) आहे. शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन कुटुंबात जागेवरुन वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादाचं रुपांतर हत्येत झालं. आरोपीनं संतापाच्या भरात महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलावर कार घालून दोघांची हत्या केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी सध्या फरार आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    नेमका प्रकार काय

    शितल येनारे या अहमदनगरमधील पारनेर येथील कुंभार गल्लीमध्ये राहतात. त्यांचे शेजारी राहणारे श्रीमंदिलकर याच्यासोबत त्यांच्या घराच्या जागेच्या मोजणीवरुन गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी दोन्ही कुटुंबामध्ये जागेवरुन वाद झाला. त्यामुळे संतपालेल्या आरोपीने मायलेकरावर गाडी घालुन त्यांची हत्या केल्याच आरोप येणारे कुटुंबियाने केला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

    अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा नाहक बळी
    याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर आणि येनारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहत होते. अनेक दिवसापासून जागेवरुन धुसफूस सुरूच होती. यातून अनेकदा वादावादीही झाली. भरधाव कार अंगावर घातल्याने महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती.