बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी देणारे गजाआड; शिवसेना पदाधिकारी ताब्यात

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काचदेखील फोडण्याने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सूरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : पुण्यात शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार तथा माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रात्री भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्याची (Car Smash) चिथावणी (Incitement) देणारे हिंगोलीतील (Hingoli) शिवसेना पदाधिकारी बबन थोरात (Baban Thorat) यांना अटक केली आहे.

    शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काचदेखील फोडण्याने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सूरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना मुंबईतून रात्री अटक केली. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतप्त झाले आहेत.