Arrested for abandoning 15-day-old baby near Marine Drive intersection

मरिन ड्राईव्ह चौपटीजवळच्या एका बस स्टॉपच्या आडोशाला १५ दिवसांच्या बाळाला सोडून देणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपींना गाठले आहे(Arrested for abandoning 15-day-old baby near Marine Drive intersection).

    मुंबई : मरिन ड्राईव्ह चौपटीजवळच्या एका बस स्टॉपच्या आडोशाला १५ दिवसांच्या बाळाला सोडून देणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपींना गाठले आहे(Arrested for abandoning 15-day-old baby near Marine Drive intersection).

    पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्थानकावरील तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून ही कारवाई केली आहे. सरोज सत्यनारायण सहारण आणि रामसेवक प्रेमलाल यादव अशी आरोपींची नावे आहेत.

    या प्रकरणातील सरोजच विवाह तिच्या दुप्पट वयाच्या राजस्थानमधील एका व्यक्तीबरोबर झाला होता. गेल्या रक्षाबंधनावेळी सरोजचा भाऊ राम हा तिला भेटायला राजस्थानला गेला होता.मात्र त्यावेळी मला येथे राहायचे नाही मुंबईत घेऊन चल म्हणून सरोजने त्याच्याकडे आग्रह धरला. आणि ती मुंबईला परत आली. मात्र मात्र तिने आपण परत जाणार नाही असा निर्णय घेतला.

    दरम्यानच्या काळात ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. तिने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र उशीर झाला होऊन अखेर तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र पतीला आधीच सोडल्यामुळे तिने बाळाला आपल्याजवळ न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनाच तिने त्या बाळाला या ठिकाणी सोडून निघून गेली.

    विशेष म्हणजे यावेळी तिचा असा विचार होता की या भागात श्रीमंत लोक येथे सतत येत असल्याने ते या बाळाला घेऊन जातील. मात्र त्याआधीच गेल्या ६ मे रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौपाटीजवळच्या बस स्टॉपच्या आडोशाला कोणीतरी अज्ञाताने हे नवजात बाळ ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन बालकाला ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर त्यानंतर या बळावर औषधोपचार करुन बाल कल्याण समितीच्या आशा सदनमध्ये ठेवण्यात आले. तर आता ते सध्या बाळ जसलोक रुग्णालयात आहे आई माहिती पोलिसांनी दिली आहे.

    घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत त्या बालकाला ज्याने ठेवले याचा शोध सुरु केला. बालकाला तिथे ठेवणाऱ्या महिला आणि पुरुष हे चर्चगेट रेल्वे स्थानकावरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तर बालकाला ठेवून गेल्यानंतर ते मरिन लाईन्स रेल्वे स्थानकात गेल्याचे दिसले. त्यामुळे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे चर्चगेटवरुन दादरला उतरले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसल्याचे दिसून आले.

    त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चर्चगेट रेल्वे स्टेशन तसेच त्यानंतर मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी प्रभादेवी, लॉवर परेल, दादर, दादर सेंट्रल, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, शहाड, अंबिवली, टिटवाळा, खडवली या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून आरोपींना अखेर खडवली रेल्वे स्थानकातून शोधून काढदल्याची माहिती पोलिसांनी दिली.