एटीएसची मोठी कारवाई – परवेझ झुबेरला टेरर फंडिंग प्रकरणात अटक

टेरर फडिंगच्या (Terror Funding Case) प्रकरणात युएपीए (UAPA) अंतर्गत परवेझला अटक करण्यात आली आहे. एटीएसकडून (ATS) ही कारवाई करण्यात आली आहे.

    मुंबई : एटीएसकडून (ATS) परवेझ झुबेरला अटक (Parvez Zubair Arrest) करण्यात आले आहे. टेरर फडिंगच्या प्रकरणात युएपीए (UAPA) अंतर्गत परवेझला अटक करण्यात आली आहे. परवेझ डी कंपनीसाठी टेरर फंडिग करण्यासाठी पाकिस्तानातील अनीस इब्राहिमसोबत संपर्कात होता.

    महाराष्ट्र एटीसने (ATS) टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणी परवेझला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परवेझ अनेक वर्षांपासून फरार होता. अखेर परवेझला अटक करण्यात आली आहे.

    परवेझ अंमली पदार्थाच्या धंद्यातून तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांमधून मिळालेला पैसा देशात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले. परवेझला मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

    परवेझ हा बऱ्याच वर्षांपासून दाऊद इब्राहिम गँगशी संबधित असून तो खंडणी आणि बऱ्याच गुन्ह्यांमध्ये फरारी होता. त्यानंतर तो दुबईला पळून केला. एटीएसने अटक केलेला परवेझ हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. वेगवेगळी रुपं घेऊन तो अनेक ठिकाणी तो वास्तव्य करत होता. तसेच दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम याच्याही संपर्कात होता. आता मोठा सापळा रचून अखेर एटीएसच्या पथकाने परवेझला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. एटीएस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे.