गुजरात निवडणुकीपूर्वी १३ जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा अधिक ठिकाणी एटीएसची छापेमारी

देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली ११-१२ नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील १३ जिल्ह्यांतील १०० ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसने ६५ जणांना अटकही केली. अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी ही छापेमारी केली आहे.

    अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election) १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान (Voting) पार पडणार आहे. मात्र, गुजरातमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (Anti-Terrorism Squad) कारवायांचा सपाटा सुरु केला आहे. १३ जिल्ह्यांमधील १०० हून अधिक ठिकाणी छापेमारी (Raids) केली आहे. काल रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

    देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोठी कारवाई केली ११-१२ नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील १३ जिल्ह्यांतील १०० ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसने ६५ जणांना अटकही केली. अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी ही छापेमारी केली आहे.

    मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागाने कारवाई केली. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचे वातावरण आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत मोठी बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.