ठाण्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यावर कार्यालयात घुसून हल्ला

मुंब्य्रातील एमआयएमच्या कार्यालयात काल रात्री ९ च्या सुमारास १० ते १२ अज्ञात हल्लेखोर हातात सळया, कोयते घेऊन घुसले. त्यांनी तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. बिलाल असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून सय्यद पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे गुंड आले असल्याची माहिती आहे.

    ठाणे : मुंब्रा (Mumbra) येथील एमआयएम (AIMIM) पक्षाचे कार्यालय आणि कार्यकर्त्यावर (Activist) अज्ञातांनी हल्ला (Attack) केला आहे. यामध्ये एमआयएमचा एक कार्यकर्ता जबर जखमी झाला असून हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. सदर जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    मुंब्य्रातील एमआयएमच्या कार्यालयात काल रात्री ९ च्या सुमारास १० ते १२ अज्ञात हल्लेखोर हातात सळया, कोयते घेऊन घुसले. त्यांनी तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. बिलाल असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून सय्यद पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे गुंड आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर सय्यद पठाण यांनी पोलिसांत तक्रार दिली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

    हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दहा ते बारा अज्ञात हातात सळया, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचे दिसते. त्यानंतर त्यांनी कार्यालयात असलेल्या बिलाल या तरूणावर जीवघेणा हल्ला केला असून तो या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.